राहुल आवाडे यांना एक लाख 31 हजार 919 तर मदन कारंडे यांना 75 हजार 108 इतकी मते मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यात राहूल आवाडे यांची विक्रमी उच्चांक ही मताधिक्य घेत एक नवा विक्रम निर्माण केला आहे. राजीव गांधी सांस्कृतिक भवनात शनिवारी सकाळी आठ वाजता प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. एकूण वीस टेबलावर ही मतमोजणी करण्यात आली. कोरोचीतील मतदान केंद्रापासून सुरू झालेल्या मतमोजणी पासून राहुल आवाडे यांचे मताधिक्य कायम ठेवले होते. जसजसे फेऱ्या होत गेल्या तसतसे मताधिक्य वाढत गेले त्यामुळे आवाडे समर्थकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली. शहरातून मोटरसायकल रॅली काढून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांमध्ये राहुल आवाडे हे सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. त्याविषयी त्यांनी आणखी एक मताधिक्य मोडून काढले आहे, त्यामध्ये सन 2019 मध्ये आमदार प्रकाश आवडे यांना 49 हजार 810 मतांचे मताधिक्य मिळाले होते त्यांचे हे मताधिक्य त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी मोडून काढले. राहुल आवाडे हे सुमारे 56 हजार 811 इतक्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत.