2025 ला ‘हे’ चार अ‍ॅक्शनपट बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, यातील दोन आहेत खूपच खास

2024 चा हा शेवटाच महिना आहे. या वर्षी बॉलिवूडने अनेक हिट चित्रपट दिले. येणारं नवं वर्ष देखील बॉलिवूडसाठी खास असणार आहे. कारण नव्या वर्षामध्ये एकापेक्षा एक अ‍ॅक्शनपट रिलीज होणार आहेत. 2024 हे वर्ष अक्षय कुमार साठी म्हणावं तसं चागलं राहिलं नाही. मात्र 2025 मध्ये अक्षय कुमारचे काही चित्रपट रिलीज होत आहेत. त्यातील काही चित्रपट हे कॉमेडी तर काही चित्रपट हे अ‍ॅक्शनपट आहेत.अक्षय कुमार सोबतच ऋतिक रोशन आणि शाहिद कपूरचा देखील अ‍ॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जर तुम्हालाही अ‍ॅक्शनपटांची आवड असेल तर 2025 हे वर्ष तुम्हाला नक्कीच निराश नाही करणार. येणारं वर्ष हे तुमच्यासाठी खास ठरू शकतं. कारण या वर्षी अ‍ॅक्शनचा तडका असलेले अनेक चित्रपट रिलिज होणार आहेत.नव्या वर्षामध्ये चित्रपटांच्या माध्यमातून तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची अ‍ॅक्शन लेव्हल अनुभवायला मिळू शकते. यावर्षी तुम्हाला चित्रपटात कलाकारांच्या अशा जोड्या देखील पाहायला मिळणार आहेत, ज्यांनी यापूर्वी कधीच एकत्र काम केलेलं नाहीये.

2025 ला रिलिज होणारे प्रमुख अ‍ॅक्शनपट

‘सिकंदर’ (Sikandar)

साजिक नाडियावाला या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि निर्माता आहे. हा चित्रपट 2025 ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. सलमान खानकडून या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असणार आहे, हा एक अ‍ॅक्शनपट आहे.

‘लाहौर 1947’ (Lahore 1947)

या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे आहेत.हा चित्रपट देखील नव्या वर्षात रिलीज होणार आहे. मात्र अजून या चित्रपटाची रिलीज डेट कंफर्म झालेली नाहीये. या चित्रपटाचा निर्माता अमिर खान असून, तो देखील या चित्रपटामध्ये भूमिका करणार आहे.सनी देओल आणि प्रिती झिंटा हे या चित्रपटात लीड लोडमध्ये दिसणार आहेत.

‘स्काई फोर्स’ (Sky Force)

24 जनवरी 2025 ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. संदीप केवलानी यांनी या चित्रपटाला दिग्दर्शित केलं आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि निमरत कौर यांची प्रमुख भूमिका असणार आहे.

‘वॉर 2’ (War 2)

हा देखील एक अ‍ॅक्शनपट असून यामध्ये ऋतिक रोशन, शबीर आहलुवालिया, जॉन अब्राहम आणि कियारा आडवाणी प्रमुख भूमिकेत असणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 पर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे.