शेतीपूरक व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करा

शेतकरी बांधवांनी केवळ पारंपरिक शेती न करता शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीपूरक व्यवसाय, लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज आहे, असे मत राज्य कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केले. कारंदवाडी (ता. वाळवा) येथे शेत शिवार भेटअंतर्गत शेतकरी भेट देऊन केळी पिकाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी फूड प्रोसेसिंग या बेसन डाळ मिलला भेट दिली. जिल्हाधिकारी अशोक काकडे व अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे त्यांच्या समवेत होते. कारंदवाडी येथे कृषी आयुक्त सुरज मांढरे व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी स्वागत केले. पथकाने कारंदवाडी येथील मधुकर लाड यांच्या केळी पिकाची पाहणी केली तर विद्या कोडोलकर यांच्या यश फूड प्रोसेसिंग या बेसन डाळ मिलला भेट दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, तालुक कृषी अधिकारी इंद्रजित चव्हाण, मंडलाधिकारी संभाजी हांगे, आष्टा मंडल कृषी अधिकारी अलका आवटी, ग्राम महसूल अधिकारी विशाल उदगिरे, सरपंच हिम्मत पाटील, कृषी सहाय्यक अधिकारी सावित्री आटुगडे, कृष्णानगर पोलिस पाटील शीतल पाटील, शर्मिला जंगम, सचिन जंगम, महसूल सेवक रमेश रसाळ, प्रशांत पाटील, भास्कर पाटील, संजय पाटील, धैर्यशील पाटील, वैभव हाके, काशिनाथ पवार आदी उपस्थित होते.