सतीश भोसले उर्फ खोक्याबाबत पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय

सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्याबाबत पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्याला बीड कारागृहातून हलवणार आहेत .बीड जिल्हा कारागृहात बेकायदेशीररित्या गांजा आणत त्याच्या वाटणीवरून इतर कैद्यांसोबत वाद घालणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला संभाजीनगर येथील हरसुल कारागृहात हलवण्यात आले आहे.

गांजा आणण्याबरोबरच त्याच्या वाटणीवरून वाद घालणाऱ्या या चौघांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.. दरम्यान, या चौघांचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज देखील करण्यात आलेला आहे.. तत्पूर्वीच कारागृह प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून खोक्याला हरसूल कारागृहात हलवले आहे.

बीड जिल्हा कारागृहात अज्ञात व्यक्तीने गांजा भरलेला चेंडू फेकल्याचा प्रकार समोर आला होता .. चेंडूतील गांजा वाटपावरून कैद्यांमध्ये तुफान राडा झाला. कारागृहातील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. हा गांजा मागवणारा दुसरा तिसरा कुणी नसून सतीश भोसले उर्फ खोक्याच असल्याचं उघडकीस आलं .

अज्ञात व्यक्तीने शनिवारी सकाळी जिल्हा कारागृहात गांजा भरलेला चेंडू फेकला. याच गांजा वाटपावरून चार न्यायाधीन कैंद्यामध्ये जोरदार राडा झाला. यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांनी धाव घेत कैद्यांच्या हातातील चेंडू ताब्यात घेतला. यावरून कैद्यांनी कर्मचाऱ्यांनाच जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या राड्यानंतर आता सतीश भोसले उर्फ खोक्याची रवानगी छत्रपती संभाजी नगरच्या हरसुल कारागृहात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सतीश भोसले चा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर घडलेल्या कारागृहातील गांजा प्रकरणामुळे सचिन भोसलेची रवानगी हरसुल कारागृहात करण्यात आली आहे.