विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले. त्यानंतर निकाल हा 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. महायुतीला बहुमत मिळाले. हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघांचे नवनिर्वाचित आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव हौसाबाई कोंडीराम माने यांनी विधानसभा सदस्यत्वाची काल विधानभवन मुंबई येथे शपथ घेतली. यावेळी बोलताना आमदार डॉ. अशोकराव माने म्हणाले की आज माझी शपथ हातकणंगले मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी मतदारसंघातील तरुणांना रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व व विकास करण्याच्या हेतूने आज विधानभवन मुंबई येथे ‘विधानसभा सदस्य’ म्हणून शपथ ग्रहण केली.
परिवर्तनाचा ध्यास घेऊन जनतेने दिलेल्या भरभरून मतांच्या जोरावर मिळालेला विजय नक्कीच सार्थकी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. माझा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाला विकसित करण्यासाठी तसेच देव देश, धर्म आणि संविधानासोबत मी नेहमीच कटिबद्ध आहे असे ते शेवटी म्हणाले.