Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सरकार स्थापन केले. आता सध्या खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा सुरू असून, अधिवेशनाआधी म्हणजे १४ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खातेवाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. आजतकने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असे महायुतीतील नेत्यांकडून सांगितले जात होते. सूत्रांच्या माहितीनुसार १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.

मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात काही मोठ्या नेत्यांचा समावेश केला जाणार नाही. गेल्या सरकारमध्ये काही कॅबिनेट मंत्र्यांची कामगिरी वाईट राहिली. त्यामुळे सरकारवर विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली, असे सूत्रांनी सांगितले.