नवे पारगाव येथील मोकळ्या माळावरील झुडपात आढळला महिलेचा मृतदेह

हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या मोकळ्या माळावरील एका झुडूपात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेचा अंदाजे 35 ते 40 वय आहे. या महिलेच्या अंगावर निळ्या, पिवळ्या रंगाची साडी राखाडी रंगाचा ब्लाउज आहे. सड पातळ अंग, गोरा रंग असलेल्या महिलेच्या उजव्या हातावर सुरेश गंगाबाई राठोड हे नाव गोंदिलेले आहे. पेठवडगाव पोलीस या महिलेची ओळख पटवण्यासह अधिक तपास करत आहेत. या अनोळखी महिलेचा मृतदेह पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.