महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित शिक्षणव्यवस्थेत मोठे बदल प्रस्तावित केले आहेत.
२०२६-२७ पासून शाळेचे शैक्षणिक वर्ष जूनऐवजी १ एप्रिलला सुरू होणार आहे. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळेल.
परीक्षेच्या पद्धतीतील बदल:
दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन होणार
1) मुख्य परीक्षा (Main Exam) 2) श्रेणी सुधारणा परीक्षा (Improement Exam)
परीक्षांमध्ये घोकंपट्टीऐवजी *रचनात्मक शिक्षणावर भर देण्यात येणार.
अभ्यासक्रम आणि विषय निवडीतील स्वातंत्र्य:
CBSE च्या धर्तीवर अभ्यासक्रम तयार. विद्यार्थ्यांना आवडीनुसार विषय निवडण्याची मुभा राहणारा आहे. गणित व विज्ञान यांचे स्वरूप अधिक प्रगत होणार.
अध्यापनातील बदल:
तासिकेची वेळ ४५ मिनिटांऐवजी ५० मिनिटे करण्यात येईल. शाळांच्या वेळा दोन सत्रांमध्ये विभागल्या जातील.
‘दप्तरमुक्त शाळा’ उपक्रम:
६वी ते ८वीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी १० दिवस दप्तरमुक्त शाळा भरवण्यात येणार कलेच्या विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिप व सर्जनशीलतेसाठी प्रोत्साहन दिला जाईल.
टप्प्याटप्प्याने धोरणाची अंमलबजावणी:
२०२५-२६: इयत्ता दुसरीपर्यंत अभ्यासक्रम बदल करण्यात येईल.
२०३०: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूर्णतः लागू होईल.