सांगोल्यातील रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे प्रकरण तापले, कारवाईकडे लागले तालुक्याचे लक्ष

सांगोला  तालुक्याला मिळालेल्या 6 रुग्णवाहिकेचा नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झाला नाही. यामध्ये विद्यमान आमदार यांचा राजशिष्टाचार होणे अपेक्षित होते. आणि ते तालुका आरोग्य प्रशासनाकडून झाले नाही म्हणून, केलेल्या तक्रारीनुसार तालुका वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती सांगोला यांनी मा. विधानसभा सदस्य यांचा राजशिष्टाचार करणेस कसूर केलेबाबत शासन नियमानुसार कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अर्जदारास परस्पर देणेत यावा असा आदेश पुणे विभाग आस्थापना उपआयुक्त नितीन माने यांनी दिला आहे. या आदेशावरून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.