सांगोल्यात आज रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

काल रामनवमीचा उत्सव सर्वत्र साजरा करण्यात आला. अनेक गावागावांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले होते. तर सांगोल्यात रामनवमीनिमित्त आज म्हणजेच गुरुवारी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभा यात्रेत सांगोला शहर व तालुक्यातील सर्व रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

दुपारी चार वाजता श्री राम मंदिर, महादेव गल्ली सांगोला येथून या शोभा यात्रेला प्रारंभ होणार असून शहरातील प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा नेण्यात येणार आहे. या शोभायात्रेस अकरा फुटी भव्य दिव्य अशी श्रीरामांची मूर्ती मुख्य आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर भव्य लाईट व लेझर शोचे ही आयोजन करण्यात आलेले आहे.