सांगोला मतदारसंघात मागील साठ वर्षांपासून शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे वर्चस्व आहे. मागील निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेचे शहाजी बापू पाटील निवडून आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शहाजी पाटील शिंदे सेनेत गेले. त्यातच शेकापणे पारंपारिक हक्काचा मतदारसंघ म्हणून महाविकास आघाडीकडे ही जागा मागितली आहे. रविवारी सकाळी शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत सांगोला मतदारसंघ शेकापला सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा वेगळा विचार करावा लागेल. त्यामुळे सांगोल्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. सांगोला मतदारसंघावरून मविआच्या जागा वाटपात ठाकरेंच्या शिवसेनेत आणि शेकापमध्ये सध्या वाद सुरू आहे. त्यातच शरद पवार शेकापला ही जागा सोडावी यासाठी आग्रही आहेत त्यामुळे ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवार ब्रेक लावणार का हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. सांगोला मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीकडून न सुटल्यास शेकापने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे.