खानापूर-आटपाडी मतदारसंघातून सुहास बाबर हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वैभव पाटील यांचा पराभव केला व पहिल्याच प्रयत्नात त्यांना आमदारकी मिळविण्यात यश आले. खानापूर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी म्हणून मला आपला मतदारसंघ आदर्शवत करायचा आहे. मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षाही तितक्याच मोठया आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन आमदार सुहास भैया बाबर यांनी केले. आमदार सुहास भैया बाबर म्हणाले आमदार म्हणून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मी राहीन.
आपल्याकडे आता पाणी आले आहे त्यामुळे कृषी, पशुसंवर्धन खात्यांच्या कामाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. कृषीचे अनुदान कुणाला मिळाले, कुणाला मिळाले नाही याचाही आढावा घ्या. पशुसंवर्धन विभाग व सर्व विभागांमध्ये रिक्त जागा भरण्याचा माझा प्रयत्न आहे. आपणाला मिळालेली आमदारकी म्हणजे स्वर्गीय आमदार अनिलभाऊ यांनी केलेले प्रचंड काम आणि जनतेचे अलोट प्रेम यामुळे आहे हे मी कधी विसरणार नाही असेही ते म्हणाले.