आमदार सुहास भैया बाबर मंत्रीपदाच्या शर्यतीत…..

नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आणि या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. आता प्रतीक्षा आहे ती मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची. लवकरच मुख्यमंत्री कोण असणार याचा फैसला होणार असून आता खानापूर आटपाडी मतदारसंघालाही मंत्रीपद मिळणार असल्याचे वृत्त आहे.शिवसेना पक्षातून बंड करून एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर सत्ता स्थापन केली आणि या सत्ता स्थापनेत दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचा मोठा वाटा होता. सलग दोन वेळा आमदार झाल्यानंतर आणि जेष्ठ, अभ्यासू आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांना पाठीमागील मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल अशी आशा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे बोलूनही दाखवले होते. परंतु त्यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आणि या ठिकाणी त्यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना काम करावे लागेल.

सध्या सुहास बाबर हे शिवसेनेमधील निवडून आलेल्या टॉप पाच आमदारांमध्ये जास्त मते घेणारे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदार सुहास बाबर यांचे नाव मंत्रीपदासाठी जवळजवळ निश्चित झाले आहे.त्यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे नाव आता राज्यभर चर्चेला जाणार आहे

तर दुसरीकडे भाजपकडून जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर हेही मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे नाव आता राज्यभर चर्चीला जाणार आहे.

सध्या सुहास बाबर हे शिवसेनेमधील निवडून आलेल्या टॉप पाच आमदारांमध्ये जास्त मते घेणारे आमदार आहेत. तसेच स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांचे मतदारसंघातील जनतेचे राहिलेले स्वप्न एकनाथ शिंदे हे पूर्ण करणार आहेत. नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर यांना ते आपल्या मंत्रिमंडळात घेणार आहेत तशा हालचाली ही वरिष्ठ पातळीवर सुरू असून त्यांचे नाव मंत्री पदासाठी जवळपास निश्चित झाले आहे.

तर दुसरीकडे याच मतदारसंघातील रहिवासी असणारे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील भाजपचे निष्ठवान नेते आहेत. त्यांनी थेट जनतेतून जत विधानसभा निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी त्यांनी विजयी मिळवला. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकार्य आहेत. त्यामुळे त्यांचे देखील नाव मंत्रिमंडळाच्या शर्यतीत आहे त्यांना देखील या मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आमदार सुहास बाबर यांच्याबरोबर आमदार गोपीचंद पडळकर हे दोघेही मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.