आटपाडी तालुक्यातील माडगुळे(Madgule) व नेलकरंजी येथील बीएसएनएलच्या मोबाईल उपकेंद्राच्या बंद खोल्यांचे कुलूप तोडून चोरटयांनी इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आणि बॅटऱ्या , असा एकूण अंदाजे ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. हि घटना ३ जुलैरोजी पहाटे घडली . याप्रकरणी बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता सतीश दत्तात्रय माळी (वय ५८,रा. विटा ) यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. माडगुळे येथून दोन कम्बाईनर कार्ड , दोन टीआरई कार्ड , एक कार्ड, तर नेलकरंजी येथून दोन नग कम्बाईनर कार्ड ,दोन टीआरई, एक कार्ड चार बॅटरी सेल ,असा ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला.तपास हवालदार यादव करत आहेत.
माडगुळे , नेलकरंजीत बीएसएनएलच्या उपकेंद्रातून ३७ हजारांचा मुद्देमाल लंपास
