आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार त्यानंतर…

सरकारने दिलेल्या तारखेपर्यंत वाट पाहू, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. तर सरकारने दिलेल्या तारखेनंतर २८८ पाडायचे की २८८ उभे करायचे हे ठरवू, असं मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य करत एकप्रकारे सरकारला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. ‘आम्ही आता १३ जुलैपर्यंतच वाट बघणार… मराठा समाजाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे १३ जुलैपर्यंत बघू आता काय करताय.’, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

तर सगेसोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्येप्रमाणे हवी, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जर मागणीप्रमाणे मराठा समाजाला हवं तसं आरक्षण सरकारने दिलं तर आम्हाला राजकारणात जायचं नाही. पण जर नाही दिलं नाहीतर बैठक घेऊन त्यानंतर २८८ पाडायचे की २८८ उभे करायचे हे ठरवू, असं मनोज जरांगे पाटील  म्हणाले.