बँकेत नोकरी करणाऱ्या इच्छुक तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्हाला आता इंडिया पोस्ट पेमेंट बँक येथे स्पेशलिस्ट ऑफिसर पदावर नोकरी करण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे.कारण की सध्याच्या घडीला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे.
बँकेत जाहीर केलेली भरती ‘आयटी मॅनेजर स्पेशलिस्ट ऑफिसर’ या पदासाठी भरती काढली आहे. या भरतीची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे.
अर्जाची शेवटची तारीख :
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भरती काढली गेली असून 2024 च्या 21 डिसेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अर्जाची शेवटची तारीख 2025 मधील जानेवारी महिन्याची 10 तारीख दिली गेली आहे.
रिक्त पदांसाठी भरती जाहीर :
जाहीर केलेली भरती ही स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी केली आहे. ही भरती आयटी विभागात होणार असून 61 पदांसाठी जाहीर केली आहे. ज्यामध्ये असिस्टंट मॅनेजर आयटी पदासाठी 54 रिक्त जागा आहेत. त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी एक्सपोर्ट पदासाठी एकूण 7 रिक्त जागा निघाल्या आहेत. ही संपूर्ण भरती कंत्राटी पद्धतीने होणार असून लवकरात लवकर इच्छुक तरुणांनी कर्जाची तारीख सुरू झाल्यानंतर अर्ज प्रक्रियेला सुरुवात करावी.
उमेदवाराचे वय
नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे.