किती वर्षांच्या सेवेनंतर मिळेल पेन्शन, वयाच्या 50 व्या वर्षीही घेता येईल लाभ?

कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटना, EPFO, देशातील खासगी नोकरदारांसाठी EPS पेन्शन (pension) योजना चालवते. या योजनेअंतर्गत EPFO सदस्यांना सेवा कालावधी आणि पगाराच्या आधारावर ठराविक कालावधीनंतर मासिक पेन्शन मिळते. EPFO ने कर्मचारी पेन्शन योजना (EPS) 16 नोव्हेंबर 1995 रोजी सुरू केली होती आणि कर्मचारी कुटुंब पेन्शन योजना 1971 च्या जागी पेन्शन योजना सुरु केली गेली पण, यासाठी काही अटी आहेत.

तुम्ही 10 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्ही पेन्शनसाठी पात्र आहात. ईपीएफओच्या नियमांनुसार कोणताही कर्मचारी EPF मध्ये योगदान देत असेल तर 10 वर्षे काम केल्यानंतर पेन्शन मिळविण्यास पात्र होतो. पण वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यावरच पेन्शन मिळणे सुरु होईल.

दहा वर्ष सेवेचा कालावधी पूर्ण केला नाही तर EPFO सदस्य पेन्शन फंड विड्रॉ करू शकते. याबाबत ईपीएफओचे स्वतःचे नियम आहेत. म्हणजेच, तुमची सेवा 10 वर्षे किंवा त्याहून अधिक होताच ईपीएसची संपूर्ण रक्कम काढता येत नाही. आता तुम्ही मासिक पेन्शनसाठी पात्र आहात, जे 58 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर मिळू लागते.

EPFO सदस्य वयाच्या 50 वर्षी पेन्शनचा दावा करू शकतात पण वय 58 वर्षांपेक्षा कमी असेल तर पेन्शनमध्ये 4% कपात होईल. प्रत्येक वर्षापेक्षा कमी असल्यास ही वजावट 4% वाढेल. तुम्हाला 55 वर्षात पेन्शन घ्यायची असेल तर ही वजावट 12% असेल आणि तुम्हाला 52 वर्षांच्या वयात पेन्शनघ्यायची असेल तर 24% वजावट लागू होईल. याशिवाय तुमचे वय 50 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही.