सांगोला शहरात असणारा मिरज रोड येथील बोगदा व महूद रेल्वे गेट येथील रेल्वे हद्दीतील असणारे सुरू होणाऱ्या शहरात कोणत्याही प्रकारची वाहतुकीची कोंडी अथवा गैरसोय न होता पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगोल्यातील बैठकीत दिले.
मिरज रेल्वे गेट भुयारी मार्ग क्रमांक ३२ बंद करण्याबाबत व पर्यायी मार्गे वाहतुक सुरू करण्याबाबत शहीद अशोक कामटे संघटनेसमवेत रेल्वे अधिकारी पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका यांची घटनास्थळी कामानंतर पुढील टप्प्यात रेल्वे गेट क्रमांक ३१ महूद रोड येथील काँक्रिटीकरण कामास सुरुवात होणार असल्याचे रेल्वे विभागातील अभियंता दीपक सिंह, गणेश वाळके यांनी यावेळी सांगितले.
वरील दोन्हीही कामे पूर्ण पर्यायी मार्ग सुरू करण्याकरता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गुनगुले नगरपालिका अभियंता डिंगणे, कुर्डुवाडी लोहमार्ग पोलीस, संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार
पर्यायी मार्गाची पाहणी करण्यात आली व सकारात्मक चर्चा नुकतीच संपन्न झाली.
सदरील बैठकीत चर्चेतून पर्यायी मार्गांचा प्रश्न सुटून बोगद्यातील कामास लवकर सुरुवात होणार असल्याचे रेल्वे अधिकान्यांनी सांगितले. शहर व परिसरातील दुचाकी व चारचाकी वानधारकांनी रेल्वे लाईन समांतर बाह्य वळण रस्त्याचा वापर करावा, अवजड वाहनांची वाहतूक ही महूद रेल्वे गेट मार्गे एकतपुर रस्त्याने नागपूर – रत्नागिरी महामार्गाने वळवण्यात येणार आहे. या कामी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी शहरातील वाहनधारक व नागरिकांकरिता समन्वयाची भूमिका घेतल्यामुळे हा प्रश्न सुटण्यास खूप मोठी मदत होणार आहे.
सदरची कामे दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण राहणार असल्याचे रेल्वे अभियंता यांनी यावेळी सांगितले. समस्या निवारणाकरिता सर्व विभागांचे संयुक्तीत बैठक लावण्याकरता पोलिस काँ आप्पासाहेब पवार यांचे सहकार्य लाभले.