सह्याद्री फार्मसीत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी , मेथवडे येथे प्रथम वर्ष पदविका , डी . फार्मसी अभ्यासक्रमाचा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अर्ज सुविधा केंद्र म्हणून महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीत डी .फार्मसी प्रवेश बाबत मोफत मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीपकुमार इंगवले यांनी दिली. या केंद्रामध्ये प्रवेशप्रक्रियेसाठी लागणारी गुणपत्रके , प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे व संपूर्ण प्रवेशप्रक्रिया या बद्दल सखोल माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात येणार आहे.

सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी या सुविधा केंद्रामध्ये बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पदविका (डी . फार्मसी ) प्रथम वर्ष प्रवेशकरिता ऑनलाईन अर्ज दि. २३ जुलै ते २५ ऑगस्ट दरम्यान स्वीकारले जाणार आहेत. तात्पुरती मेरिट लिस्ट २८ ऑगस्टला तर अंतिम मेरिट लिस्ट ३ सप्टेंबर रोजी आहे. बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज, रजिस्ट्रेशन करण्यासाठी संकेतस्थळाचा वापर करायचा आहे.

सह्याद्री (Sahyadri) कॉलेज ऑफ फार्मसी या सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन व मूळ कागदपत्रे पडताळणी , अर्ज निश्चिती होणार आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील यांनी केले आहे.