मेष रास
आज उत्साह थोडा कमी असला तरी पैसा आणि ताकद याबाबतीत कशाचाही अपव्यय सहन करणार नाही.
वृषभ रास
कौटुंबिक स्तरावर थोडे भावनिक संघर्ष अनुभवास येतील घरामध्ये नको त्या व्यक्तीसाठी पैसा खर्च करावा लागेल.
मिथुन
आज थोडा चिडचिडेपणा वाढणार आहे थोडे अपेक्षाभंगाचे दुःखही पदरात पडण्याची शक्यता आहे.
कर्क रास
हातचे सोडून पळत्याच्या मागे धावल्यास हाताला काहीच लागणार नाही.
सिंह रास
वडिलांच्या तब्येतीत जपावे लागेल अनावश्यक पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
कन्या रास
शेजाऱ्यांच्या विक्षिप्त वागण्याचा त्रास होईल महिलांना जुन्या परंपरांचा तिटकारा येईल.
तूळ रास
संततीच्या आणि तुमच्या विचारांमध्ये तफावत राहील.
वृश्चिक रास
अति महत्त्वाकांशामुळे चंचल वनाल. अस्थिर मनवृत्तीमुळे जवळच्या लोकांशी वादविवाद संभवतात.
धनु रास
आज मानापमानाच्या कल्पना जरा तीव्रच बनतील.
मकर रास
राजकारण समाजकारण आणि लोकोपयोगी कामे करणे खूप आवडेल.
कुंभ रास
आज तुम्ही जे ठरवाल ते करून दाखवणार आहात त्यामुळे तुमचा रुबाब वाढेल.
मीन रास
भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे योग्य व्यक्तींशी संवाद साधाल.