स्टेट बँकेत 50 जागांवर भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, आजच करा अर्ज…

सरकारी नोकरीसाठी बारावी पास आणि पदवीधर विद्यार्थ्यांकडून जोमाने प्रयत्न सुरू असतात. सरकारी नोकरीसाठी जाहिरात कधी निघते आणि आपण कधी अर्ज भरतो, असेच त्यांचं नियोजन असते. त्यानुसार, लेखी परीक्षांची तयारी देखील त्यांच्याकडून केली जाते. बँकींग परीक्षा, पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षांच्या तयारीत ते स्वत:ला झोकून देऊन प्रयत्न करतात. या सर्व उमेदवारांना आता बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक पदाच्या 50 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. त्यामुळे, इच्छुक व शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरी अर्ज करता येईल. 

वयोमर्यादा

किमान 20 आणि कमाल 28

1 एप्रिल 2024 रोजीच्या तारखेला अनुसरुन उमेदवाराचे वय ग्राह्य धरले जाणार आहे.

शेवटची तारीख

अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे. 

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

SC: 4 पदे
ST: 5 पदे
OBC: 13 पदे
EWS: 05 पदे
सर्वसाधारण: 23 पदे
एकूण पदे –  50

असा करा अर्ज

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in भेट द्या
होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा.
स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ उघडेल.
तुमचा नोंदणी फॉर्म येथे भरा.
फी भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
फॉर्म सबमिट करा.
त्याची प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

ऑनलाईन अर्जसाठी लिंक – https://sbi.co.in/