हातकणंगले विधानसभा निवडणुकीत डॉ. अशोकराव माने हे प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले. त्यांची आमदार पदी नियुक्ती झाली. त्यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न जाणून घेत आहेत. तसेच मतदारसंघांचा अधिकाधिक विकास कसा होईल यासाठी कायम दक्ष आहेत. शिरोळचे सुपूत्र असलेले आमदार डॉ. अशोक माने यांचा शिरोळकर वासीयांच्या वतीने शिरोळचे प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष अमरसिंह शिवाजीराव भिमबहाद्दर माने-पाटील (भैय्या) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार डॉ. माने म्हणाले, शिरोळ शहरातील मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मी कायम कटीबध्द राहीन. तसेच हातकणंगले विधानसभा मतदारसंघाला विकासाचे मॉडेल बनविण्यासाठी माझा प्रयत्न राहील. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी मेस्त्री कट्टा ग्रुप, व्यापारी असोसिएशन यांच्यावतीने माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील यांनी आम. डॉ. माने यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.