कृषी पंपांना मीटर बसविण्याचा निर्णय रद्द करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा; वाळव्यात बैठक संपन्न

अन्यायी मीटर बसविण्याच्या जाचक अटी विरोधात चर्चा करून त्यावर आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी पेठ येथील जनाई हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य एरिगेशन फेडरेशनने सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन केलेले होते.

राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत कृषी पंपांना तसेच राज्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्था कृषी पंपांना मीटर बसविण्याचा निर्णय स्थगित ठेवून येत्या 5 जानेवारी पर्यंत आम्हास चर्चेस वेळ द्यावा अन्यथा आम्ही कोल्हापूर, सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यातील शेतकरी कोल्हापूर येथे तीव्र आंदोलन करू असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी वाळवा तालुक्यातील पेठ येथील चार जिल्ह्यातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या मेळाव्यात दिलेला आहे.

खाजगी व सहकारी पाणीपुरवठा योजनांना मीटर बसविण्याच्या निर्णयास स्थगिती देऊन टेंभू, ताकारी, म्हैसाळसारख्या 23 सरकारी पाणी योजनांना मीटर बसवून त्याचा अभ्यास करण्याचा निर्णय अप्पर सचिवांशी सहा जून 2024 रोजी झालेल्या बैठकीत झालेला होता मग सचिवांनी मीटर बसविण्याचा आदेश कसा काढला असा सवाल देखील त्यांनी या बैठकीत केलेला आहे.

.