कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर ना. चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा भाजपाच्या वतीने ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. उद्या म्हणजेच रविवारी 29 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापूर रेल्वे स्टेशन या ठिकाणी सकाळी सहा वाजता भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. स्वागतानंतर दिवसभरातील नियोजित दौऱ्यानंतर ना. चंद्रकांतदादा पाटील हे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत भाजपा जिल्हा कार्यालय नागळा पार्क या ठिकाणी उपस्थित राहून शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
उद्या कोल्हापुरात ना. चंद्रकांत दादा पाटील यांचे होणार जल्लोषी स्वागत……
