आळते हायस्कूलला भरीव मदत देणार; अजित टारे

हातकणंगले तालुक्यातील आळते येथे बाळासाहेब पाटील (दादा) हायस्कूल व भाऊसो चौगुले बालविद्या मंदिराचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. रोटरी क्लबच्या माध्यमातून माझ्या गावच्या शाळेला मी नेहमीच मदतीचा हात दिलेला आहे. माझे गाव माझी शाळा हेच माझे धोरण मनात बाळगून आळते हायस्कूलसाठी जे काही देता येईल ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहीन असे प्रतिपादन उद्योगपती अजित टारे यांनी केले.