मोहित सुरी यांचा रोमॅंटिक सिनेमा लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय यांची केमिट्री पुन्हा एका चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं फायनल डिटेल्सचे काम सुरु आहे. येत्या काही दिवसात या चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. काही दिवसांपूर्वी दोघांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चेलाही उधाण आले.

आशिकी 2 मध्ये श्रद्धा आणि आदित्यने चाहत्यांना वेड लावले. दोघांची केमिट्री चाहत्यांना फार भावली. दरम्यान आता आशिकी 2 चे दिग्दर्शक मोहित सुरी दोघांना पुन्हा एकत्र आणणार आहे. दोघांचा एक रोमॅंटिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते आता दोघांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मोहित सुरी यांनी आशिकी 2, एक व्हिलन, हाफ गर्लफ्रेंड, हमारी अधुरी काहानी सारखे सुपरहिट चित्रपट दिले. त्याता आता श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय यांचा रोमँटिक चित्रपट येत असल्याने चाहत्यांना या ही चित्रपटात काहीतरी वेगळे पहायला मिळणार आहे.आशिकी चित्रपटानंतर श्रद्धा आणि आदित्यची जोडी प्रेक्षकांना खूप भावली. 2017 मध्ये ओके जानू चित्रपटातून दोघे पुन्हा चाहत्यांना एकत्र पहायला मिळाले. शाद अली यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले होते. हा सिनेमा हवा तितका चालला नव्हता. तरी देखील दोघांची केमेंट्री प्रेक्षकांना फार भावली.