पुष्पा 2 येणार ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस!

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला सुपरहिट ठरला. ‘पुष्पा’मधील अल्लू अर्जुनच्या स्टाइलची आणि डायलॉगच्या चाहत्यांनाही भूरळ पडली होती.त्यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेता अल्लू अर्जुनचा गेल्या वर्षी 2023 मध्ये एकही चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. मात्र आता 2024 मध्ये बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा 2’ मध्ये धमाल करताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘पुष्पा 2’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याच्या बातम्या येत होत्या.

दरम्यान, एका रिपोर्टनुसार अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा 2’ 15 ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर रिलीज होणार आहे. ‘पुष्पा 2’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलेली नाही. निर्मात्यांनी चाहत्यांना एक नवीन अपडेट दिले आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘पुष्पा 2’ निर्माता आणि मैत्री मूव्ही मेकर्सच्या नवीन पोस्टमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत खुलासा केला आहे. दरम्यान, ‘पुष्पा 2’च्या निर्मात्यांनी चित्रपट दिग्दर्शक सुकुमार बी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, हा चित्रपट चालू वर्षाच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

प्रेक्षकांना ‘पुष्पा 2’ मध्ये अल्लू अर्जुनची अनोखी शैली पाहायला मिळणार आहे. ‘पुष्पा 2’ चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, विजय सेतुपती, सई पल्लवी, प्रियामणी, अनसूया भारद्वाज, सुनील, प्रकाश राज, श्रीतेज, जगपती बाबू, राव रमेश आणि इतर कलाकारांशिवाय दिसणार आहेत.