राज्यातील परिचारिकांनी आजपासून बेमुदत संप सुरु केला आहे. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीचे वय वाढवण्याची मागणीसाठी हा संप सुरु केला आहे. या संपात पुणे जिल्ह्यातील एक हजार परिचारिका सहभागी झाल्या आहे. राज्यात ठिकठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या संपामुळे पुणे जिल्ह्यास राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. घाटी रुग्णालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. सर्व शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी संपामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर आली आहे.
राज्यात परिचारिकांनी पुकारलेल्या संपामुळे आरोग्य विभागाने पर्यायी व्यवस्था सुरु केली आहे. जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व वर्ग चारचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. यामुळे नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना बोलवण्यात आले आहे. अनेक शासकीय रुग्णालयात नर्सिंगच्या विद्यार्थ्यांवर काम सुरु करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे परिचारिक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे.