सांगोला तालुक्यात केंद्रीय सरकारच्या पथकाने केली दुष्काळग्रस्त भागाची पाहणी!

यावर्षी सांगोला तालुक्यात कमी पाऊस झाल्याने राज्य शासनाने माळशिरस, बार्शी, सांगोला, माढाव करमाळा या पाच तालुक्यात तर जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातील ४५ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केलेला आहे. केंद्र शासनाकडून ही दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.

त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्य केंद्रीय पाहणी पथक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेले असून पथकाने काल सांगोला तालुक्यातील अचकदाणी, महुद बु येथील शेतक-यांच्या शेतावर जाऊन दुष्काळाच्या तीव्रतेची तसेच नुकसान झालेल्या तूर, मका, ज्वारी पिकांचीशेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकयांच्या बांधावर जाऊन पथकातील सदस्यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील सिंचन विहिरी व पाझर तलावाची ही प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी आढावा घेतला.या दुष्काळ पाहणी पथकात केंद्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरण व केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या उपसचिव श्रीमती सरोजिनी रावत यांचा समावेश आहे.

यावेळी केंद्रीय दुष्काळ पथकाने पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांची व फळबागांची पाहणी, पाझर तलाव, शेतकन्यांच्या शेतातील कोरड्या पडलेल्या विहिरी, पाहणी केली. यावेळी दुष्काळामुळे शेतकऱ्यासाठी सध्या असलेल्या पाण्याची व्यवस्था जनावरांचा चारा, पाणी पातळीची खोली आदी कामे याबाबत पाहणी करून माहिती घेतली.

यावेळी कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवत असून तातडीने चारापाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर दुष्काळामुळे नुकसान झालेल्या तूर, मका, ज्वारी, ऊस व अन्य पिकांची माहिती दिली. या नुकसान झालेल्या पिकांसाठी शासनाकडून त्वरित मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यानी पथकातील सदस्याकडे केली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, माळशिरस उपविभागीय अधिकारी नामदेव हे टिळेकर, माढाउपविभागीय अधिकारी ज्योती आंबेकर, कृषी उपसंचालक तथा प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. के. वाघमोडे, सोलापूर लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता धीरज साळी, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. समीर बोरकर, वरिष्ठ भुवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण अधिकारी एम. ए. जे शेख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन एस नरळे यांच्यासह तहसिलदार सुरज शेजुळ, संतोष कणसे, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, आनंद लोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, सांगोला तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, आबासाहेब रुपनवर, तसेच ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.