संस्थाचालकाने शिक्षकांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत शाळेला ठोकले कुलूप

अनेक शाळांमध्ये वेगवेगळे आदेश काढले जातात. ज्याचे पालन देखील अनेक शाळांमध्ये कातरको रपणे केले जाते. पण अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या विरोधात अनेक तक्रारी देखील आलेल्या पहायला मिळतात. सांगोला चिंचोली रोडशेजारी कै.वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालय इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत माध्यमिक शाळा कार्यरत आहे. शाळेत मुख्याध्यापकासह ८ शिक्षक, लिपिक इतर तीन कर्मचारी पदे कार्यरत आहे. विद्यार्थी पटसंख्या १८७ आहे.

दरम्यान, संस्थाचालकांनी मुख्याध्यापक, शिक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता ३१ डिसेंबर २०२४ रोजी संस्थेच्या कार्यालयासह स्टाफ रूम कुलूप बंद केले. त्यामुळे मुख्याध्यापक शिक्षकांची गैरसोय झाली आहे. संस्थाचालकांनी कार्यालयास कुलूप लावल्याबद्दल मला कसलीही माहिती दिली नाही. त्यामुळे माझ्यासह शिक्षक गेल्या आठवड्यापासून डेली हजेरीपत्रकावर सह्यांविना कार्यालयाच्या बाहेर राहून शालेय कामकाज काम करतात.

शिवाय शाळेचे दैनंदिन कार्यालयीन कामकाजही ठप्प आहे. याबाबत, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप व सांगोला गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांच्याशी संपर्क साधून तोंडी कळविले होते. त्यांनी एक-दोन दिवस वाट पाहून नंतर काय तो निर्णय घेता येईल, असे मुख्याध्यापक रमेश पवार यांनी सांगितले.

अध्यापन गुणवत्ता पटसंख्या व शिस्तीबाबत मुख्याध्यापक, शिक्षक यांचे कामकाज समाधानकारक नसल्याने मुख्याध्यापकांना यासंदर्भात खुलासा करण्याविषयी पाच लेखी पत्र देऊनही त्यांनी अद्याप खुलासा केला नाही.