वाढलेला मतदानाचा टक्का ठरणार निर्णायक….

मतदानात ज्या ज्या वेळी टक्का वाढतो, त्यातील बहुतांशी वेळी परिवर्तन घडत असल्याचे समोर येते. माढा व सोलापूर लोकसभा मतांचा टक्का किंचित वाढला आहे. वाढलेला टक्का परिवर्तन घडविणार की पुन्हा भाजपच्या उमेदवारांना विजयी करणार?या बद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

माढ्यातील माण, फलटण, सांगोला, माळशिरसमध्ये वाढलेला मतांचा टक्का, सोलापुरातील शहर दक्षिण, शहर मध्य, शहर उत्तर, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात वाढलेला मतांचा टक्का निर्णायक ठरणार आहे.