विशाळगडावर येणार्‍या पर्यटकांच्या पूर्ण नोंदी ठेवण्याची मागणी

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. तसेच गड किल्ले देखील असल्यामुळे पर्यटकांची कायम गर्दी पहायला मिळतेच. विशाळगड प्रशासनाने भाविक, पर्यटकांसाठी खुला केला आहे. मात्र, गडावर जाणार्‍यांच्या पूर्ण नोंदी ठेवाव्यात, तसेच अन्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने केली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. प्रशासनाने विशाळगड पर्यटकांसाठी खुला केला आहे. मात्र काही धर्मीय आणि अन्य संघटनांच्या मागणीमुळे हा आदेश काढला का, असा सवाल करत गडावर जे पर्यटक जातात, ते अन्य हेतूने जात नाहीत ना, याकरिता आधार कार्ड तपासावे, त्यांच्या नोंदी ठेवाव्यात, गडावर गेलेले सर्व खाली येतात का हे तपासण्याची व्यवस्था करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.