सध्या अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. पाण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा देखील केला जातो. वाळवा तालुक्यातील कार्वे, ढगेवाडी, जक्राईवाडी, ऐतवडे बुद्रुक, शेखरवाडी, शिवपुरी, वाघवाडी ही गावे पूर्णपणे विहीर बागायत आहेत. सध्या येथील ओढ्याचे पाणी आटले असून, येत्या फेब्रुवारी महिन्यापासून शेतीच्या पाण्यासाठी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे ऐतवडे बुद्रुक व परिसरातील गावातील तलाव व ओढ्यांना सोडावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
येथील शेतीस पाणीटंचाई भासू न देण्यासाठी वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी बंदिस्त पाईप लाईनमधून कार्वे, ढगेवाडी जक्राईवाडी, शेखरवाडी, शिवपुरी, वाघवाडी येथील ओढ्यात ज्या ज्या ठिकाणी वितरण व्यवस्था केली आहे त्या चेंबरमधून लवकरा लवकर सोडावे, अशी मागणी होत आहे.