सध्या चोरीच्या प्रकारात वाढ झाल्याचे दिसतच आहे. दिवसाढवळ्या बंद घरे फोडून मुद्देमाल लंपास केला जात असल्याचे प्रकार निदर्शनास येतच आहेत. हातकणंगले तालुक्यात देखील चोरीच्या अनेक घटना उघडकीस आलेल्या आहेत. हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील चक्क जलशुद्धीकरणाचे एटीएम फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हेरले येथील बौद्ध समाज गावातील विहिरीवर बसवलेले जलशुद्धीकरण एटीएम मशीन अज्ञात व्यक्तीने फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थातून मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामपंचायतीने विहिरीवर जलशुद्धीकरण एटीएम मशीन बसवले होते. जेणेकरून गावातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळू शकेल. मात्र, काल रात्री अज्ञात व्यक्तीने हे म शीन फोडून त्यातील महत्त्वाचे तांत्रिक उपकरण दगडाने फोडले असल्याचे दिसत आहे. या घटनेची माहिती मि ळताच ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुरणे, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन कदम, तसेच स्थानिक नागरिक सुरेश कदम, शिवा खाबडे, संजीव शिंगे, पप्पू उलसार यांनी पाहणी केली. गावातील नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.