मौजे वडगावात जय हनुमान दूध संस्थेच्या नुतन इमारतीचे आ.अमल महाडिक व आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते उद्घाटन! संस्थेची वाटचाल कौतुकास्पद

सध्या प्रत्येक भागात अनेक दूध संस्था कार्यरत आहेत. ज्यामुळे दूध उत्पादकांना त्याचा पुरेपूर लाभ देखील होत असतो. अशा काही दूध संस्था आहेत ज्यांची वाटचाल खूपच उल्लेखनीय आहे. हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील जय हनुमान दूध संस्थेची वाटचाल देखील कौतुकास्पद आहे. मौजे वडगाव येथील जय हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित मौजे वडगाव या नूतन इमारतीचे उद्घाटन नूतन आ.अमल महाडिक व आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते संपन्न झाले.

या संस्थेने दूध पुरवठ्यात सातत्य राखलेले पहायला मिळत आहे. या हेअरीच्या दुधाची प्रतही चांगली आहे. गायीच्या दुधाला अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे मागणी करणार आहे. तसेच सोलर धोरण लवकरच अंमलात आणणार असल्याचे जिल्हा गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

या कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वास पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक व माजी आमदार सुजित मिणचेकर, मुरलीधर जाधव, गोकुळ दूध संघाचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे मौजे दडगावच्या लोकनियुक्त सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच रघुनाथ गोरड यांची उपस्थिती होती. मिणचेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्कृष्ट दूध पुरवठादारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.