आज पहाटेपासून हुपरी येथे मदरशाचे बांधकाम हटवण्यास सुरुवात; परिसरामध्ये तणावाचे वातावरण!

हुपरी येथील मदरशाचे प्रकरण प्रत्येकालाच माहिती आहेच. हुपरी यथील हे मदरशाचे बांधकाम हटवण्याची नोटीस देखील बजावली होती. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील सरकार गायरान भूमी गट क्रमांक 844 अ/1 पैकी मालमत्ता क्रमांक 4489 ची मिळकतीवर सुन्नत जमियतच्या बांधकामासंदर्भात हुपरी नगरपरिषदेने 12 डिसेंबर रोजी मुस्लिम सुन्नत जमियतला अंतिम नोटीस दिली असून या नोटीसीची मुदत 28 डिसेंबर पर्यंत होती.

अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करणेत येईल अशी नोटीस मुख्याधिकारी अजय नरळे यांनी मुस्लिम जामियतला बजावली होती. येथील अतिक्रमण करून बांधण्यात आलेले मदरशांचे बांधकाम नगर पालिकेने आज पहाटे पासून हटवण्यास सुरवात केली आहे. याला मुस्लिम समाजाने विरोध केला आहे.अतिक्रमण परिसर सिल करण्यात आले असून परिसरातील पहिलीच घटना असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिक्रमण काढून न घेतल्याने नगरपालिकेने पहाटेपासून प्रचंड बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यासाठी सुरवात केले आहे.