मुस्लिमाचा पवित्र महिना आता संपत आहे. या पवित्र महिन्यात मुस्लिम लोक रोज ठेवत असतात. त्या अनुषंगाने ठिकठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. हुपरी-रेंदाळ परिसरातील हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून सन २००० साली रमजान महिन्यातील २७ व्या दिवशी अॅड सी. बी . कोरे यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. तेव्हापासून आजपर्यंत सलग २५ वर्षे झाले तरी हा उपक्रम अखंडीत चालू आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात ते इफ्तार पार्टीचे आयोजन करुन अन्नदान व इतर वस्तुंचे दान करतात. हा उपक्रम मानवतेची सेवा म्हणून पार पाडतात. याचबरोबर वर्षभर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवितात. याकरिता ते स्वतःला भाग्यवान समजतात व ही सेवा आपले हातून घडल्याबद्दल ईश्वराप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. वरील उपक्रमाबद्दल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष वजीर खुतूब, शब्बीर मुजावर, मनसुर नाईकवडे, बापू नाईकवडे, महम्मद मुजावर, रसुल मुजावर, वगैरे सर्वांचे सहकार्य लाभले व समाजाचे वतीने अॅड. कोरे यांचा सत्कार करणेत आला.