बोर्डाच्या परीक्षांत मिळणार चांगले गुण; उत्तरे लिहताना ठेवा ‘या’ गोष्टी लक्षात

बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांनी आता तयारीला लागायला सुरुवात केली आहे. बोर्डाच्या परीक्षा कठीण मानल्या जातात. महत्वाची गोष्ट अशी आहे कि अशा वेळी विद्यार्थ्यांच्या डोक्यावर असणारा प्रेशर त्याच्या तणावाला आणखीन वाढ देतो.

जर डोईवर प्रेशर असेल तर परीक्षेचा ताण आणखीन वाढतो. तर काही टिप्स आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही उत्तरे लिहताना इतर गोष्टींवर लक्ष ठेवू शकता. प्रश्न समजून घ्या. परीक्षा कोणतीही असो, परंतु प्रश्न समजणे फार महत्वाचे आहे. प्रश्नाचा उत्तर देण्यासाठी आधी प्रश्न समजणे फार महत्वाचे असते. त्यामुळे जेव्हा हातामध्ये प्रश्न पत्रिका येते, तेव्हा तिला समजून घ्या. घोळून प्या आणि नंतर उत्तरे देण्यास सुरुवात करा. याने उत्तरे अधिक पद्धतशीर देता येतील.

शब्दमर्यादेचे भान ठेवा

प्रश्नाच्या उत्तरासाठी दिलेल्या शब्दमर्यादेचा विचार करूनच उत्तर लिहा. उत्तरामध्ये परिचय, मुख्य भाग, आणि निष्कर्ष यांचा समावेश होईल याची काळजी घ्या. अर्धवट उत्तरांमुळे परीक्षकावर वाईट छाप पडू शकते. म्हणूनच प्रत्येक उत्तर ठरलेल्या शब्दमर्यादेत पूर्ण करा. उत्तराचा फॉर्मेट समजून घ्या. उत्तरे अगदी पद्धतशीर लिहा.

हस्ताक्षर स्वच्छ ठेवा

अनेक विद्यार्थी परीक्षेच्या शेवटच्या क्षणी घाई करताना हस्ताक्षराकडे दुर्लक्ष करतात. हे टाळा. वेळेचं योग्य नियोजन करा, आणि प्रत्येक उत्तर स्वच्छ व नीटनेटकं लिहा. चांगलं हस्ताक्षर परीक्षकावर सकारात्मक प्रभाव टाकतं. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर आकर्षित करण्यात जास्त मदत करतात.

फॅक्ट्स आणि डायग्रामचा वापर करा

उत्तर लिहिताना महत्त्वाच्या फॅक्ट्सचा समावेश करा. योग्य तारखा, आकडेवारी, आणि माहिती सादर केल्यास परीक्षक प्रभावित होतो. जर उत्तरासोबत डायग्राम आवश्यक असेल, तर तो नक्की काढा आणि त्यावर योग्य लेबेल लावा. कधी कधी समजवून देण्याच्या कार्यात शब्द अपुरे पडतात, तेव्हा तिथे तक्ते कामी येतात. त्यामुळे याचा योग्य वापर करा.

शब्दसंपत्तीचा विकास करा

चांगलं उत्तर लिहिण्यासाठी तुमची शब्दसंपत्ती मजबूत असणे गरजेचे आहे. जर तुमच्या कडे शब्द साठा उत्तम असेल तर तुम्हाला उत्तरे लिहण्यास जास्त त्रासही होणार नाही. तसेच तुमची भाषा सोपी आणि स्पष्ट असेल, तर उत्तर परीक्षकाला लगेच समजेल आणि चांगले गुण मिळतील. त्यामुळे वाचन महत्वाचे आहे. अशा काही टिप्स लक्षात ठेवल्यास तुम्ही बोर्डाच्या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवू शकता. आत्मविश्वास ठेवा, तणाव टाळा, आणि यश नक्कीच तुमचं होईल!