महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना होळीच्या आधीच एक मोठी भेट मिळाली आहे. यावर्षी देशात 14 मार्च रोजी होळीचा मोठा सण साजरा होणार आहे आणि 14 मार्चला धुलीवंदन साजरा होणार आहे.
दरम्यान होळीच्या आधीच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी पूर्ण झाली आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या लाभाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि याबाबतचा जीआर देखील निर्गमित करण्यात आला आहे.
सेवानिवृत्तीनंतर राज्य कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ग्रॅच्युटीच्या म्हणजे सेवानिवृत्ती उपदान / मृत्यू उपदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. खरे तर आधी सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा 14 लाख रुपये एवढी होती.म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना कमाल 14 लाख रुपये इतके सेवानिवृत्ती उपदान मिळत होते.
पण आता ही रक्कम सहा लाख रुपयांनी वाढवण्यात आली असून राज्य कर्मचाऱ्यांना आता कमाल 20 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युटी मिळणार आहे. राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय काल अर्थातच 11 मार्च 2025 रोजी निर्गमित केला आहे.महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत यासंदर्भातील जीआर म्हणजेच शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
