प्रत्येक गावातील गटतट बाजूला ठेवून विकास करणार- आ. अशोकराव माने यांची ग्वाही

हातकणंगले तालुक्यातून आमदारपदी डॉ. अशोकराव माने यांची निवड झाली. त्यांनी आमदारकीचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्व सामान्य नागरिकांचे तसेच विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी जाणून घेत आहेत. त्यावर उपाय देखील करत आहेत. खोची येथील नानिवळे धरणग्रस्त वसाहत येथे रस्ता कामाचा शुभारंभ करताना दलित मित्र आमदार अशोकराव माने व मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी खोचीसह मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास करताना राजकारण व गावातील गटतट बाजूला ठेवून विकास करणार आहे.

तसेच कोणत्याही कामासाठी मतदारसंघातील नागरिकांना अडकून ठेवणार नाही. आपल्या गावात कोणते काम प्राधान्याने करावे लागणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत कडून त्या कामाचा ठराव देणे महत्त्वाचे असते. हे गावातील पदाधिकारी, नागरिकांनी प्राधान्याने लक्षात ठेवून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन, अशी ग्वाही हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी दिली.

हातकणंगले तालुक्यातील खोची येथील नानिवळे वसाहत येथे आ. विनयरावजी कोरे व आ. अशोकराव माने यांच्या प्रयत्नातून २५१५ योजनेमधून मंजूर झालेल्या पाच लाख रुपये खर्चाच्या अंतर्गत रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रोहिणी पाटील होत्या. यावेळी प्रा. बी. के. चव्हाण, वारणा दूध संघाचे संचालक दिपकराव पाटील, पंचायत समिती माजी सदस्य वसंतराव गुरव, भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील प्रमुख उपस्थित होते.