हातकणंगले तालुक्यातील विकासकामांसाठी 33 कोटींचा निधी मंजूर!

सरकारकडून अनेक नवनवीन योजना या सतत राबवल्या जातात. अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा करण्यासाठी निधी देखील दिले जातात. विविध गावातील तलाठी कार्यालय बांधकाम, रस्ता, पुल अशा विविध ७ महत्त्वाच्या कामांसाठी ३३ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजूबाबा आवळे यांनी दिली असून लवकरच या कामांना प्रारंभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हातकणंगले तालुक्यातील गावांतील तलाठी कार्यालयाच्या बांधकामासाठी ३ कोटी ३० लाख रुपये, सावर्डे व लाटवडे यांना जोडणारा मधल्या रस्त्यासाठी ४ कोटी रुपये, रामलिंग फाटा ते धुळोबा रस्त्यातील एका टप्प्यासाठी ६ कोटी रुपये, टोप दक्षिणवाडी ते नागाव रस्ता दुरुस्तीसाठी ५ कोटी, रुई गावाजवळ लहान पुलासाठी २ कोटी, इंगळी गावाजवळ पूल व हातकणंगले ते रूई व तळंदगे दरम्यानचा रस्ता व पुलासाठी ७ कोटी तसेच कर्मवीर संकुल कुंभोज ते हातकणंगले तालुका रद्दी दरम्यानच्या रस्त्यासाठी ६ कोटी असा एकूण ३३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.