महिलांना आर्थिक आधार आणि सशक्तिकरण यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्य सरकारने सुरू केली. या योजनेनं महायुतीला भरभरुन निवडणुकीत यश दिल्याचं नेत्यांनीच कबूल केल.सातवा हप्ता अद्याप न आल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत आहे. अखेर, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सातवा हप्ता कधी येणार याबाबत तारखेची घोषणा केली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 जानेवारीपासून सातवा हप्ता खात्यावर जमा होईल असं सांगितलं.महिलांच्या वाढत्या तक्रारींवर सरकारने अखेर स्पष्टीकरण दिलं. मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं की, २६ जानेवारीला सातव्या हप्त्याचं वितरण सुरू होईल. पुढील चार ते पाच दिवसांत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील.