LPG सिलिंडरच्या किंमतीबाबत मोठी बातमी…..

महिन्याच्या सुरुवातीला तेल वितरण कंपन्यांनी मोठा धक्का दिला आहे. 1 मार्च 2024 रोजी पुन्हा एकदा LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली. त्याअंतर्गत दिल्ली आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये एलपीजी सिलिंडर महाग झाला आहे.तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत.

तर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत. हा सलग दुसरा महिना आहे जेव्हा 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत वाढवण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) या सरकारी तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा 25.50 रुपयांची वाढ केली आहे, जी देशातील सर्वाधिक आहे. ही वाढ 1 मार्च 2024 पासून म्हणजेच शुक्रवारपासून लागू झाली आहे.