सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता! तूर डाळीचे दर गडगडले; प्रतिकिलो ‘इतकी’ झाली स्वस्त

सध्या महागाईने प्रत्येक क्षेत्रात डोके वर काढले असून यामुळे सर्वसामान्य जनता मात्र मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाल्याची स्थिती आहे. दैनंदिन वापराच्या अनेक गोष्टींमध्ये प्रचंड महागाई मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.जर आपण सांगली शहरातील बाजार बघितला तर त्या ठिकाणी तूर डाळीचे दर प्रतिकिलो चाळीस रुपयांनी घसरले आहेत व इतकेच नाही तर त्यासोबत मूग तसेच मसूर व हरभरा डाळीचे दर देखील घसरले आहेत. सांगली बाजार समितीमध्ये क्विंटलला तूर डाळीचा दर 13500 होता. जो त्याच्या पंधरा दिवसांपूर्वी 17 हजार पाचशे रुपये होता.

किरकोळ बाजारात तूर डाळीचे दर 190 रुपये किलो पर्यंत पोहोचले होते व त्यामध्ये आता घट होऊन चक्क तूर डाळीचे दर दीडशे रुपये प्रतिकिलो पर्यंत खाली आले आहेत.सणासुदीच्या कालावधीमध्ये आपण बघितले होते की हरभरा डाळ 110 रुपये किलोपर्यंत होती व त्यामध्ये देखील आता घसरण झाली असून हरभरा डाळीचे दर वीस रुपयांनी खाली आले आहेत. तसेच मसूर डाळ 90 रुपये किलोवर स्थिर आहे तर मूग डाळीचे दर देखील प्रति किलो दहा ते पंधरा रुपयांनी घसरले आहेत.