चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांसमोर या चोरीचा छडा लावण्याचे आव्हान आहे. पंचतारांकित एमआयडीसी कागल येथून मंजुनाथ राजेश देसाई (वय २४, रा. तळंदगे ता. हातकणंगले) याला केबल चोरीप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .याबाबत अधिक माहिती अशी की, पंचतारांकित एमआयडीसी कागल येथे नवीन पोलिस चौकीसमोर मंजुनाथ देसाई कटिंग केलेल्या सात हजार रुपये किमतीच्या केबल घेऊन उभा होता. यावेळी पोलिसांनी विचारणा केली असता, त्याने समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही. त्याच्याकडे चोरलेल्या केबल आढळून आल्या. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे करत आहेत.
हातकणंगलेतील केबल चोरी करणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..
