सध्या वाळू तस्कर अवैधरित्या राजेरोसपणे सुरु असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या अवैध्य वाळू चोरीविरोधात अनेकांनी आवाज उठविला तरीदेखील हा धंदा सुरुच आहे. आटपाडी तालुक्यात वाळूचोरीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महसूल प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तस्करांची मुजोरी चांगलीच वाढली असून गावोगावचे ओढे, तलाव आणि माणगंगा नदीपात्र वाळूचोरांकडून पोखरले जात आहे. आटपाडी तालुक्यातील महसूल विभागाने वाळूचोरांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय दिले आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या या वाळूचोरीमुळे गावोगावचे नैसर्गिक स्रोत नष्ट होत आहेत, तर खासगी जमिनींचेही मोठे नुकसान होत आहे. महसूल विभाग, तहसीलदार, प्रांताधिकारी आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. ज्यामुळे सामान्य नागरिक संतप्त झाले आहेत.
संबंधित महसूल विभागाने वाळूचोरांविरोधात कडक कारवाई न करण्याची भूमिका घेतल्यामुळे आटपाडीतील नामांकित डॉक्टरांनी स्वतः पुढाकार घेत या वाळूचोरांविरोधात आता थेट मोहीमच उघडली आहे. मध्यरात्री १२ वाजता डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काटेरी झुडपांत लपून वाळूचोरांवर छापा टाकला. यावेळी त्यांनी तीन वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले. मध्यरात्री१२ वाजता मध्यरात्री वाळूचोरांवर छापा टाकला. वाळूतस्करांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि एका तस्काराने डॉक्टरांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला.
मात्र, डॉक्टरांनी हिंमत दाखवत त्याला रोखले आणि वाळूचोरी करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला. डॉक्टरांनी दाखवलेल्या धाडसामुळे वाळूचोरीविरोधात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. प्रशासन स्थानिक राजकीय नेत्यांनी वाळूचोरी थांबवण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. महसूल विभागाला जबाबदार धरणे हेच गरजेचे आहे. डॉक्टरांनी वाळूचोरांवर कारवाई केल्यानंतर तस्करांनी राजकीय नेत्यांना मदतीसाठी पाचारण केले. या नेत्यांनी डॉक्टरांना तस्करांना माफ करण्याची विनंती केली. मात्र, डॉक्टरांनी ती ठामपणे नाकारली आणि तस्करांना सोडणार नसल्याचा इशारा दिला.