प्रवाशांसाठी परिवहन मंत्र्यांचा मोठा निर्णय! आता लाल परिसाठी नो वेटिंग, गर्दीलाही टाटा बाय- बाय…..

मोठी बातमी समोर येत आहे, लालपरीच्या प्रवाशांसाठी गुडन्यूज असून, आता एसटीचा प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होण्यासाठी परिवहन मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या 5 हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, असा निर्णय आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे बसेसची संख्या वाढणार असून, एसटी बसच्या फेऱ्या वाढल्यामुळे प्रवाशांवर बससाठी वाट पाहात ताटकळत बसण्याची वेळ येणार नाही. तसेच बसच्या फेऱ्या वाढल्यामुळे प्रवाशांची गर्दी देखील नियंत्रीत होणार आहे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ कामकाज आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला  एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.