Saif Ali Khan: आता कशी आहे सैफची प्रकृती? रुग्णालयाकडून मोठी हेल्थ अपडेट समोर

अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला गुरुवारी मध्यरात्री झाला होता. हल्लेखोराने अभिनेत्याने सहा वार केले. अशात रक्तबंबाळ सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रिक्षातून अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या लिलावती रुग्णालयात अभिनेत्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्यावर सहा वार झाले. त्यामधील दोन वार अधिक गंभीर होते.

ज्यासाठी सैफची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.आता रुग्णालयाकडून सैफच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट देण्यात आली आहे. आता अभिनेत्याचं हेल्थ अपडेट रुग्णालय प्रशासनाने जारी केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सैफची प्रकृती पूर्वीपेक्षा उत्तम आहे. आता अभिनेत्याला आयसीयू मधून नॉर्मल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. सैफच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे.