इचलकरंजी येथील पालक शिक्षक संघातर्फे दहावीनंतर काय ? या विषयावर चर्चासत्र होणार आहे. २० डिसेंबरला दुपारी अडीच वाजता श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात कार्यक्रम होणार आहे. यामध्ये नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी हा कार्यक्रम असून यामध्ये शैक्षणिक वाटचालीतील पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
चर्चासत्रात प्रख्यात करिअर समुपदेशक व शिक्षण तज्ज्ञ केदार टाकळकर (पुणे) विस्तृतपणे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी राज्यभरात ३०० हून अधिक विद्यार्थी विकास कार्यशाळा घेतल्या आहेत. तीन हजारहून अधिक चर्चासत्रांमधून पालकत्व, अभ्यासाचे तंत्र, बोर्ड पेपर कसे लिहावे, प्रवेश मार्गदर्शन, अभियोग्यता चाचण्या, अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश याबाबत मार्गदर्शन केले आहे.
कार्यक्रमासाठी इचलकरंजी महापालिका, रोटरी क्लब ऑफ टेक्स्टाईल सिटी, इचलकरंजी तहसिल, माहेश्वरी सभा यांचे सहकार्य लाभले आहे..