ऐश्वर्या, अभिषेकचं तुटता -तुटता पुन्हा जुळलं, पण अभिनेत्रीच्या मनातला सर्वात हँडसम पुरुष कोण ?

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र त्या संदर्भात बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून अधिकृत स्टेटमेंट देण्यात आलं नव्हंत. मात्र सध्या तरी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये सर्व ठीक असल्याचं दिसून येत आहे. मात्र काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकला अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. ते दोघं एका पार्टीमध्ये आपली मुलगी आराध्यासोबत सहभागी झाले होते. तिथे अभिषेक आणि ऐश्वर्याने एकत्र डान्स देखील केला होता.

ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगी आराध्याने देखील हा डान्स चांगलाच एन्जॉय केला, ती देखील या डान्समध्ये सहभागी झाली होती. तिघांनी चांगलाच एन्जॉय केला. दरम्यान त्यानंतर ऐश्वर्या, अभिषेक आणि त्यांची मुलगी आराध्या हे तिघे एकत्र मुंबई विमानतळावर स्पॉट झाले होते. ते नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवरून पुन्हा मुंबईत परतले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान विमानतळावरून परतत असताना आराध्याला कोणाचा तरी धक्का लागला होता, यावर प्रतिक्रिया देताना ऐश्वर्या चांगलीच टेन्शनमध्ये आल्याची पाहायला मिळाली.

थोडक्यात काय तर आता अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यातील कटुता दूर झाली असून, ते आपलं वैवाहिक आयुष्य आनंदानं जगत आहेत. एकदा ऐश्वर्या राय ही कपील शर्माच्या शोमध्ये सहभागी झाली होती तेव्हा तीला प्रश्न विचारण्यात आला होता की तुझ्या मनातील सर्वात हँन्डसम पुरुष कोण आहे. या प्रश्नाला ऐश्वर्याने मोठ्या स्मार्टली उत्तर दिलं होतं. अभिषेक तिच्या समोरच बसला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली होती की जगातला सर्वात हॅन्डसम पुरुष माझ्यासमोर बसला आहे.